‘लॉकडाऊन’नंतरच्या काळात काळजीपूर्वक केले जाणारे नियोजन, आशावादी दृष्टिकोन आणि त्या दृष्टीने उचलली जाणारी पाऊलेच बांधकाम क्षेत्राला तारू शकतात!

‘लॉकडाउन’मुळे सर्व उद्योगधंदे ठप्प झाले असून त्याचा भारताच्या विकासदरावर मोठा परिणाम होणार आहे. येत्या काळात आपल्याला या परिणामांना तोंड द्यावे लागणार आहे. भारतात शेतीखालोखाल बांधकाम क्षेत्र विकासाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर आहे. या क्षेत्राचा एकूण जीडीपीमध्ये ८ टक्के इतका वाटा असून हे क्षेत्र दरवर्षी सुमारे ४० दशलक्ष लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते. या क्षेत्राची स्थिती बिकट झाली आहे.......